Dhanshri Shintre
गरमागरम चहासोबत कुरकुरीत समोसे खाण्याची मजा काही औरच असते, हे बटाटा-वटाण्याने भरलेले असतात.
जर तुम्हालाही समोसे खाण्याची आवड असेल, तर ही सोपी रेसिपी नक्की एकदा करून पाहा.
एका भांड्यात मैदा, थोडा रवा, मीठ, धणे, तेल आणि गरम पाणी घालून मळा, जेणेकरून समोसे कुरकुरीत आणि चवदार होतील.
रवा फुलवण्यासाठी पाणी घालणे आवश्यक आहे. स्टफिंगसाठी तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, आले आणि हिरव्या मिरच्या परतवा.
हिरव्या वाटाण्यांसोबत मॅश केलेले बटाटे, हळद, तिखट, आमचूर, जिरे पावडर, काळे मीठ आणि गरम मसाले घालून मंद आचेवर शिजवा, स्टफिंग तयार.
छोटे गोळे करून लाटून त्यात स्टफिंग भरून समोशाच्या आकारात तयार करा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर तिखट चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा