Shreya Maskar
पावसाळ्यात कुरकुरीत सोयाबीन भजी बनवा.
सोयाबीन भजी बनवण्यासाठी सोयाबीन, बेसन, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
सोयाबीन भजी बनवण्यासाठी सोयाबीन गरम पाण्यात 10-15 मिनिटे भिजवून घ्या.
भिजवलेले सोयाबीन पिळून मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्या.
आता एका बाऊलमध्ये वाटलेले सोयाबीन, बेसन, चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ एकत्र करा.
यात बेसन टाकून पातळ पीठ बनवून घ्या.
तेल गरम करून छोटे भजी गोल्डन फ्राय तळून घ्या.
गरमागरम सोयाबीन भजींचा सॉस किंवा चटणीसोबत आस्वाद घ्या.