Shreya Maskar
काकडीची भाजी बनवण्यासाठी काकडी, शेंगदाणे, जिरे, मोहरी, हळद, हिंग, लाल तिखट, साखर, मीठ, तेल आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
काकडीची भाजी बनवण्यासाठी काकडी स्वच्छ धुवून साल काढून तुकडे करून घ्या.
दुसरीकडे शेंगदाणे भाजून ते बारीक वाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि हिंग टाका.
त्यानंतर काकडीचे तुकडे, हळद, तिखट, साखर आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
काकडी शिजल्यावर त्यात शेंगदाणा कूट घाला.
गॅस बंद करून कोथिंबीर घालून भाजी सजवा.
गरमागरम चपातीसोबत काकडीच्या भाजीचा आस्वाद घ्या.