Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला हेल्दी अन् टेस्टी काही खायचं असेल तर तुम्ही सोयाबीन इडली खाऊ शकता.
सोयाबीन इडली घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोयाबीन इडली सहज बनवू शकता.
सोयाबीन इडली बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, सोयाबीन, मेथी दाणे, मीठ हे साहित्य एकत्र करा.
सोयाबीन इडली बनवण्याआधी तांदूळ आणि सोयाबीन वेगवेगळे ५ ते ६ तास भिजत घाला. उडीद डाळ आणि मेथी दाणे देखील ५ ते ६ तास भिजत घालायचे आहे.
हे संपूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे. हे मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर हे बॅटर एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि रात्रभर तसेच ठेवून द्या.
सकाळी उठल्यानंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून साच्यात इडलीचे पीठ घालून सोयाबीन इडली तयार करा. अशाप्रकारे तुमची घरच्या घरी पौष्टिक सोयाबीन इडली तयार होईल.