Shreya Maskar
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. राम चरण आणि उपासना कामिनेनी यांना जुळी मुलं झाली आहेत.
मेगास्टार चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. उपासना कामिनेनीने एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला आहे.
सध्या राम चरण आणि त्याच्या बायकोवर चाहते, कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांच्या बाळांची झलक पाहायला खूपच उत्सुक आहेत.
2012 साली राम चरण आणि उपासना कामिनेनी यांनी लग्नगाठ बांधली. थाटामाटात त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
2023 साली राम चरण आणि उपासना कामिनेनी आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी गोंडस मुलगी झाली. जिचे नाव क्लिन कारा कोनिडेला असे आहे.
लग्नाच्या 11 वर्षांनी राम चरण आणि उपासना कामिनेनी पहिल्या मुलाला जन्म दिला. आता क्लिन (Klin Kaara Konidela) च्या जन्मानंतर तीन वर्षांनी दोघांनी गोंडस जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे.
राम चरण आणि उपासना कामिनेनी यांच्या घरी डबल गुडन्यूज आली आहे. उपासना कामिनेनी हिने 36 व्या वर्षी गोंडस मुलांना जन्म दिला आहे.
राम चरण यांनी साऊथसोबत हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली आहे. चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाचे उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'आरआरआर' , 'येवडू', 'रंगस्थलम', 'मगधीरा' असे अनेक गाजलेले चित्रपट त्याने केले आहेत.