Shreya Maskar
साऊथ स्टाइल सांबार बनवण्यासाठी तूर डाळ, तेल, मेथी दाणे, चणा डाळ, तांदूळ, खडे मसाले, वेलची, लाल मिरच्या, नारळ, आलं-लसूण पेस्ट, कढीपत्ता, कांदा, मीठ, दुधी भोपाळा, चिंचेचा कोळ आणि गूळ इत्यादी साहित्य लागते.
साऊथ स्टाइल सांबार बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून जिरे, मेथी दाणा, चणा डाळ, तांदूळ, धणे, हिंग, लवंगा, वेलची, लसूण, आले, खोबरं, कढीपत्ता चांगले भाजून घ्यावे.
यात आता सर्व खडे मसाले, लाल मिरच्या, हळद, कांदा आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या.
आता हे मिश्रण थंड झाल्यावर याची पेस्ट मिक्सरला वाटून घ्या.
प्रेशर कुकरमध्ये तेल घालून त्यात हिरवी मिरची, दुधी भोपाळ्याच्या फोडी, टोमॅटो, मीठ आणि तयार पेस्ट, पाणी घालून चांगले मिक्स करा.
त्यानंतर यात भिजवलेली तूर डाळ घालून कुकरमध्ये ४-५ शिट्ट्यांमध्ये सांबार चांगला शिजवा.
आता या मिश्रणात चिंचेचा कोळ, गूळ घालून २-३ मिनिटे शिजवा.
छोट्या पॅनमध्ये तेल, मोहरी, लाल मिरच्या, हिंग, कढीपत्ता घालून तडका बनवा आणि तो सांबारवर टाका.