ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ व मेथी दाणे ५-६ तास पाण्यात भिजवा.
भिजलेले तांदूळ आणि डाळ थोडेसे पाणी घालून मिक्समध्ये बारीक वाटून घ्या.
हे पीठ रात्री झाकून ठेवा आणि किमान ८ तास आंबवू द्या. सकाळी पीठामध्ये थोडेसे मिठ घालून व्यवस्थित एकत्रित करुन घ्या.
गरम तव्यावर थोडे तेल टाकून डोस्याचे पीठ घालून पातळ पसरवा.
वरून थोडे लोणी (बेन्ने) टाका आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा.
खालची बाजू खरपूस झाली की डोसा उलटून दुसरी बाजू थोडी परतून घ्या.
गरम गरम बेन्ने डोसा नारळाची चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.