ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भूतांचे जग नेहमीच रहस्यमय राहिले आहे, परंतु आता हाय टेक उपकरणांच्या मदतीने आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकतो.
भूत प्रेतांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक आणि घोस्ट हंटर्स या डिव्हाईसचा वापर करतात.
आपल्या आसपास घडणाऱ्या घटनावर लक्ष ठेवण्यासाठी घोस्ट हंटर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड डिटेक्टर्स डिव्हाईसचा वापर करतात.
ईएमएफ मीटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड डिटेक्टर्समध्ये झालेले बदल मोजण्यासाठी वापरला जातो. ईएमएफ रिडिंगमध्ये अचानक वाढ होणे हे भूतांच्या उपस्थितीचे लक्षण मानले जाते.
गॉसमीटर हे ईएमएफ रिडिंगचे सेंसिटिव्ह वर्जन आहे. हा डिव्हाईस प्रत्येक लहानातली लहान गोष्टीची नोंद करतो.
स्पिरिट बॉक्स हे रेडिओ डिव्हाईस आहे. हा डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी स्कॅन करतो.
हे उपकरण असे आवाज रेकॉर्ड करतात जे सामान्य व्यक्ती ऐकू शकत नाही.
घोस्ट हंटर्सच्या मते, भूत - प्रेतांपर्यत संदेश पोहचवण्यासाठी या प्रिक्वेन्सीचा वापर केला जातो.