Shraddha Thik
मुंबई ही 'स्वप्नांची नगरी' म्हणून ओळखले जाते. या मुंबईत बरेच लोक त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.
मुंबईत फिरण्यासाठी अनेक धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यापैकी एक वाळकेश्वर येथील बाणगंगा.
वाळकेश्वर येथे असलेले बाणगंगा हे तलाव पवित्र आणि धार्मिकदृष्ट्यांनी महत्त्वाचे मानले जाते. येथे स्वत: श्रीराम परिसरात चरण स्पर्श झाले होते असे म्हटले जाते.
माता सीतेच्या शोधात लंकेला जात असताना श्रीराम आणि लक्ष्मण या दक्षिण-मध्य मुंबईतील वाळकेश्वर तसेच बाणगंगा तलावाच्या परिसरात चरण पडले असे म्हणतात.
हजारो वर्षांपूर्वी वाळकेश्वर हे घनदाट जंगलात आणि समुद्र किनारी होते. या ठिकाणी श्रीराम यांनी शिवलिंगाची स्थापना केली.
वाळकेश्वरमध्ये शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर श्रीरामांना तहान लागली. अशा स्थितीत त्याने बाण सोडला आणि पृथ्वीच्या आतून पाण्याचा स्रोत निघाला.
हा तलाव बनतीर्थ किंवा पाताळगंगा या नावानेही ओळखला जातो.