Manasvi Choudhary
रस्सम हे साऊथ इंडियन स्टाईल प्रसिद्ध पदार्थ आहे.
रस्सम घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
रस्सम बनवण्यासाठी तूरडाळ, मोहरी, जिरे, हळद, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, मेथी दाणे, चिंच, लसूण, कोथिंबीर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम रस्सम बनवण्यासाठी मसाल्याचे सर्व पदार्थ खमंग भाजून घ्या. त्यात १० ते १२ कडिपत्याची पाने सुद्धा खमंग भाजून घ्या.
मिक्सरमधे संपूर्ण मिश्रण बारीक करून घ्या.
गॅसवर एका भांड्यात टोमॅटो,लसूण,हळद,मीठ,गूळ कडिपत्ता,चिंचेच़ पाणी घालून ३ कप पाणी घाला मिक्स करून उकळून घ्या.
नंतर या मिश्रणात तुरीची डाळ घाला मिश्रणाला चांगली उकळून द्या.
संपूर्ण मिश्रणात २ टेबलस्पून रस्सम मसाला पावडर, मीठ चमचे घालून मिक्स करा.
आता त्यात ओलं खोबरं, कोथिंबीर घाला. अशाप्रकारे रस्सम सर्व्हसाठी तयार आहे.