Siddhi Hande
साउथ इंडियन पदार्थ हे सर्वांनाच आवडतात. यात तुम्ही डोसा, इडली खाल्ली असेल. परंतु तुम्ही कधी इडली पोडी खाल्ली आहे का?
पोडी इडली ही चवीला खूप मस्त असते. त्यावरचा पोडी मसाला हा त्याची चव अजूनच वाढवतो.
सर्वात आधी तुम्हाला तांदूळ ६-७ तास भिजवत ठेवायचे आहे.
यानंतर तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घ्यावे. त्यात भिजवलेले पोहे आणि दही टाकून व्यवस्थित मिक्स करा.
यानंतर इडलीचे बॅटर एका बाउलमध्ये टाका. त्यात पाणी टाकून मिक्स करा.
यानंतर एका गोलाकार डीशमध्ये बटर पेपर ठेवा. त्यावर इडलीचे बॅटर ठेवा आणि वाफवून घ्या.
पोडी मसाला बनवण्यासाठी आधी चणा डाळ, उडीद डाळ, तीळ आणि सुकी बेडगी मिरची भाजून घ्या.
यानंतर हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात हिंग आणि मीठ टाका.
यानंतर गरम इडली काढावी. त्यावर छान तूप टाकावं आणि त्यावर हा मसाला टाकावा.
तुम्ही ही पोडी इडली चटणी, सांबरसोबत खाऊ शकतात.