Manasvi Choudhary
साऊथ इंडियन स्टाईल इडली आणि डोशा सोबत सांबर आणि टोमॅटोची चटणी स्वादिष्ट लागते.
साऊथ इंडियन स्पेशल टोमॅटोची चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, चिंच, लसूण, हळद, मसाला, हिंग, तेल, मोहरी, जिरे, उडीद डाळ हे साहित्य एकत्र करा.
साऊथ इंडियन टोमॅटो चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो आणि चिंच एकत्र शिजवून घ्या.
टोमॅटो आणि चिंच शिजवलेल्या मिश्रणात लसूण, हळद आणि मसाला हे घाला. मिश्रण १० ते १५ मिनिटे चांगले शिजवून घ्या आणि नंतर थंड होऊन द्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी द्या. संपूर्ण मिश्रणात फोडणी मिक्स करा अशाप्रकारे टोमॅटोची चटणी तयार होईल.
तयार टोमॅटोची चटणी तुम्ही गरमा गरम इडली आणि डोसासोबत सर्व्ह करा.