Shreya Maskar
रात्रीच्या जेवणाला खास साऊथ स्टाइल नारळी भात बनवा.
नारळी भात बनवण्यासाठी तूप, लवंग, वेलची, दालचिनी, ओलं खोबरं, साखर, तांदूळ, केशर, मनुका , दूध आणि काजू- बदाम इत्यादी साहित्य लागते.
नारळी भात बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून लवंग, वेलची, दालचिनी परतून घ्या.
आता यात ओलं खोबरे आणि साखर टाकून छान मिक्स करा.
त्यानंतर या मिश्रणात बदाम, काजूचे काप आणि मनुका टाका.
सर्व मिश्रण एकजीव झाले की त्यात शिजवलेला भात टाका.
शेवटी यात केशराचे दूध टाकायला विसरू नका.
५-१० मिनिटे भात छान शिजवून घ्या.