Dabeli Recipe : ऑफिसमधून आल्यावर चटपटीत खावस वाटतंय? अवघ्या १० मिनिटांत बनेल स्ट्रीट स्टाइल दाबेली

Shreya Maskar

दाबेली

दाबेली बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, पाव, बारीक चिरलेला कांदा, डाळींबाचे दाणे, मसाला शेंगदाणे, बारीक शेव आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Dabeli | yandex

मसाले

लाल तिखट, दाबेली मसाला, मीठ, तूप, कोथिंबीर, गोड चटणी, हिरवी तिखट चटणी इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

बटाटा

दाबेली बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे.

Potato | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, दाबेली मसाला, उकडलेले बटाटे आणि मीठ छान परतून घ्या.

Frying | yandex

डाळींबाचे दाणे

आता हे मिश्रण बाऊलमध्ये काढून त्यात कांदा, डाळींबाचे दाणे, मसाला शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.

Pomegranate seeds | yandex

पाव

दुसरीकडे पावाला एका बाजूने गोड चटणी आणि दुसऱ्या बाजूने तिखट हिरवी चटणी लावावी.

Bread | yandex

बटाट्याचे मिश्रण

पावामध्ये बटाट्याचे मिश्रण टाकून पॅनमध्ये तूप टाकून पाव दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा.

Potato mixture | yandex

बारीक शेव

शेवटी पावामध्ये बारीक शेव, डाळींबाचे दाणे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून चमचमीत दाबेलीचा आस्वाद घ्या.

chopped sev | yandex

NEXT : घरच्या उपलब्ध साहित्यात अवघ्या 10 मिनिटांत बनवा मेयोनीज, फॉलो करा सिंपल रेसिपी

Homemade Mayonnaise | yandex
येथे क्लिक करा...