Shreya Maskar
आजकाल साऊथ इंडियन नाश्ता मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.
हॉटेल स्टाइल घरीच चमचमीत नारळाची चटणी कशी बनवावी जाणून घ्या.
साऊथ इंडियन स्टाइल नारळाची चटणी बनवण्यासाठी खोबरे,हिरवी मिरची, आले, चणाडाळ , मीठ, पाणी, तेल, मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, हिंग इत्यादी साहित्य लागते.
नारळाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम किसलेले खोबरे, हिरवी मिरची, आले, भाजलेली चणाडाळ आणि मीठ घालून छान मिक्सरला पेस्ट करून घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, डाळ, कढीपत्ता आणि हिंग घालून तडतडू द्या.
डाळ छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करा.
आता खोबऱ्याच्या पेस्टमध्ये मोहरीची फोडणी घाला.
घरीच अवघ्या १० मिनिटांत इंडियन स्टाइल नारळाची चटणी तयार झाली.