Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ इडली अनेकजण आवडीने खातात.
साऊथ इंडियन स्टाईल इडली बनवण्याची पद्धत सोपी आहे. तुम्ही घरी सहज बनवू शकता.
इडली बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम तांदूळ आणि उडीद डाळ ४ ते ५ तास आधी भिजत घाला. डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले नसतील तर इडली फुगणार नाही याची काळजी घ्यावी.
यानंतर तांदूळ आणि उडीद डाळ याची बारीक पेस्ट करून घ्या. हे दोन्ही मिश्रण एका मोठ्या भांड्यात ८ ते १० तास आंबवण्यासाठी ठेवा.
इडली भांड्याला तेल लावा आणि त्यामध्ये हे पीठ ओता. गॅसवर इडली बनवण्यासाठी १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या.
अशाप्रकारे सर्व्ह करण्यासाठी गरमागरम इडली तयार आहे.