Manasvi Choudhary
साऊथ इंडियन स्टाईल सांबर घरी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
साऊथ इंडियन सांबर बनवण्यासाठी तूरडाळ, टोमॅटो, कांदा, शेंवग्याच्या शेंगा, कढीपत्त , चिंत, गूळ, हळद, मोहरी, हिंग, सांबर मसाला, लाल मिरची, तेल, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम तूरडाळ स्वच्छ धुवून घ्या. भाज्या बारीक कापून घ्या आणि चिंच पाण्यात भिजत घाला.
गॅसवर कुकरमध्ये डाळ, भाज्या आणि भिजलेली चिंच मिक्स करा. या मिश्रणात मीठ आणि हळद देखील घाला.
आता एका पॅनमध्ये उकडलेली डाळ चांगली शिजवून घ्या नंतर त्यात गूळ, सांबर मसाला घालून मिसळून घ्या.
मसाला तयार करण्यासाठी एका भांड्यात मोहरी, संपूर्ण लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता घाला.
सांबर मिश्रणाला फोडणी द्या आणि नंतर संपूर्ण मिश्रण चांगले शिजवून घ्या. अशाप्रकारे सर्व्हसाठी गरमागरम सांबर तयार आहे.