Manasvi Choudhary
आजकाल लग्नात साऊथ इंडियन लूकला पहिली पंसती असते. पारंपारिक लूकमध्ये नवीन डिझाईन्सचे साऊथ इंडियन घागरी चोली पॅटर्न्स आहेत.
घागरा- चोलीमध्ये ट्रेडिशल ते मॉडर्न स्टाईलचे अनेक प्रकार आहेत जे तुम्ही लग्नात खास डिझाईन्स करून घेऊ शकता.
कांजीवरम सिल्क कापडाचा तुम्ही बॉल गाऊन स्टाईल घागरी शिवू शकता. हा एक मॉडर्न लूक आहे. लग्नात तसेच रिस्पेशन पार्टीसाठी तुम्ही हा पॅटर्न निवडू शकता.
पारंपारिक लूकसाठी तुम्ही सिंपल बारीक बुटी वर्क केलेला घागरा निवडा यामध्ये एल्बो लेथ ब्लाऊज पॅटर्न अधिक सुंदर दिसेल.
ऑर्गेन्झा-सिल्क मध्ये तुम्ही घागरा निवडू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन्स करून घ्या
'इंडो-वेस्टर्न' लूक हवा असेल, तर तुम्ही पेपलम स्टाईल ब्लाऊज आणि सिल्क घागरा निवडू शकता. यावर साडीचा किंवा जरीचा 'कमरपट्टा' घ्या.
संपूर्ण घाघऱ्यावर पौराणिक कथा किंवा निसर्गाची चित्रे असा पॅटर्नचा घागरा हवा असेल तर तुम्ही कलमकारी प्रिंटेड घागरा निवडा