Shreya Maskar
फिल्टर कॉफी बनवण्यासाठी उकळते पाणी, कॉफी पावडर, दूध, साखर, कॉटनचा कपडा इत्यादी साहित्य लागते.
फिल्टर कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी टाकून व्यवस्थित उकळवून घ्या.
उकळत्या पाण्यात कॉफी पावडर घालून छान मिक्स करा.
त्यानंतर एका वाटीवर कॉटनचा कपडा ठेवून ही कॉफी गाळून घ्या.
आता दुसऱ्या पॅनमध्ये दूध टाकून व्यवस्थित उकळी काढून घ्या.
दुधात आवडीनुसार साखर घालून छान विरघळवून घ्यावी.
साखरेच्या दुधात कॉफीचे तयार केलेले मिश्रण घाला आणि ढवळत रहा.
दोन भांड्यांच्या मदतीने कॉफी वर खाली हलवून फेस काढून घ्यावा.