Manasvi Choudhary
बीटरूट इडली हा दक्षिणेकडील प्रसिद्ध पदार्थ आहे.
बीट इडली शरीरासाठी देखील अत्यंत पौष्टिक मानली जाते.
घरीच बीटरूट इडली बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
बीटरूट इडली बनवण्यासाठी रवा, उडीद डाळ, बीट, आलं, हिरव्या मिरच्या, तेल, कढीपत्ता, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम उडीद डाळ आणि रवा भिजत घाला आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या.
हे पीठ चांगले आंबू द्या यानंतर बीट, आलं आणि हिरव्या मिरच्या यांची बारीक पेस्ट करू घ्या.
आबंवलेल्या पिठामध्ये हे संपूर्ण मिश्रण घाला चवीनुसार मीठ घालू मिश्रण झाकून ठेवा.
नंतर मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी बनवा त्यात इडलीचे पीठ मिक्स करा.
गॅसवर हे सर्व मिश्रण इडलीच्या भांड्यात सोडा आणि इडली वाफवून घ्या.
अशाप्रकारे सर्व्हसाठी बीटरूट इडली तयार आहे.