Shreya Maskar
अप्पम बनवण्यासाठी तांदूळ, किसलेले खोबरे, दही, साखर, फ्रूट साल्ट आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
अप्पम बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ चांगले धुवून 4 तास भिजवा.
तांदूळ, किसलेले खोबरे यांची चांगली पेस्ट मिक्सरला करून घ्या.
त्यानंतर मिक्सरला दही आणि साखर घालून पेस्ट करा.
त्यानंतर यात फ्रूट साल्ट घालून एकजीव करून घ्या. यामुळे अप्पम मऊ, जाळीदार होतील.
सर्व पीठ रात्रभर आंबायला ठेवून द्या.
आता एका पॅनमध्ये पाण्याचे थेंब शिंपडून गोलाकार अप्पमचे पीठ पसरवा आणि दोन्ही बाजूंनी मंद आचेवर शिजवा.
तयार अप्पम तुम्ही सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता.