Shreya Maskar
मसाला फुलका रोटी बनवण्यासाठी पाणी, जिरे, पांढरे तीळ, कोथिंबीर, काळी मिरी पूड, मीठ, ज्वारीचे पीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
मसाला फुलका रोटी बनवण्यासाठी बाऊलमध्ये पाणी घेऊन हलकी उकळी काढून घ्या.
पाण्यात जिरे, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा.
पाणी नीट गरम झाल्यावर यात ज्वारीचे पीठ मिक्स करा.
वरून थोडे थोडे पाणी टाकून चांगली कणिक मळून घ्या.
पिठाचे छोटे गोळे करून गोल चपाती लाटून घ्या.
पॅनला तेल लावून मसाला फुलका रोटी खरपूस भाजून घ्या.
गरमागरम मसाला फुलका रोटीचा भाजीसोबत आस्वाद घ्या.