Shreya Maskar
सकाळी नाश्त्याला हेल्दी म्हणून पौष्टिक मटकीची भेळ बनवा.
मटकीची भेळ बनवण्यासाठी मटकी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबाचा रस, लाल तिखट, जिरे पूड, चाट मसाला, काळे मीठ, शेव, फरसाण, काकडी आणि शेंगदाणे इत्यादी साहित्य लागते.
मटकीची भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या बाऊलमध्ये मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून मिक्स करा.
यानंतर यात लाल तिखट, जिरे पूड, चाट मसाला, काळे मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करा.
तुमच्या आवडीनुसार यात शेव, फरसाण आणि शेंगदाणे कमी प्रमाणात फक्त चवीसाठी टाका.
तुम्ही यात उकडलेले बटाटे आणि मका देखील टाकू शकता.
भेळ अजून पौष्टिक बनवण्यासाठी यात काकडी आणि डाळिंब टाका.
शेवटी मटकीची भेळवर लिंबाचा रस पिळा.