Shruti Vilas Kadam
टाटा ग्रुपच्या लक्झरी ब्रँड झोयाने हैदराबादमध्ये व्हिस्पर्स फ्रॉम द वैली हे नवे कलेक्शन सादर केले.
या लॉन्च इव्हेंटला ब्रँड अॅम्बेसेडर व बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर उपस्थित होती.
टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी डिव्हिजनचे सीईओ अजॉय चावला देखील या कार्यक्रमात सहभागी झाले.
ग्लोबल फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूरने या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले.
सोनमने राहुल मिश्रा कूचरचा अप्रतिम गाऊन परिधान करून आपला लूक खास बनवला.
झोयाच्या नव्या कलेक्शनमधील स्प्रिंग सांग चोकर आणि इयररिंग्स घालून सोनमने दागिन्यांची झलक दाखवली.
या दागिन्यांच्या डिझाईनमध्ये बर्फातील शांततेची झलक दिसून आली यामुळे सोनमचा ग्लॅमरस अंदाज अधिक खुलून आला.