Shruti Vilas Kadam
विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर यांचा 'आँखों की गुस्ताखियां' हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित झाला आणि आता ५ सप्टेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहता येईल.
क्राइम-थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी, राजकुमार राव आणि मानुषी छिल्लर यांचा 'मालिक' हा चित्रपट ५ सप्टेंबरपासून अमेझॉन प्राइम व्हिडिओ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
मनोज बाजपेयी आणि जिम सर्भ स्टारर 'इन्स्पेक्टर झेंडे' हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी एका धोकादायक गुन्हेगाराचा पाठलाग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत.
कीर्ती रेड्डी, श्रीलीला आणि जेनेलिया देशमुख अभिनीत 'ज्युनियर' हा दक्षिणेकडील चित्रपट ५ सप्टेंबरपासून अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होत आहे.
सुप्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेत्री अनुष्का शेट्टी 'घाटी' द्वारे ओटीटीवर पुनरागमन करत आहे. हा चित्रपट ड्रग्ज तस्करीवर आधारित असून ५ सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर देखील प्रदर्शित झाला आहे.
मल्याळम वेब सिरीज 'कायट्टम' ही क्राईम-थ्रिलर प्रेमींसाठी मनोरंजक असेल. इन्स्पेक्टर अँटोनियो जॉर्जच्या कथेवर आधारित ही सिरीज ५ सप्टेंबर रोजी Zee5 वर प्रसारित होत आहे.
प्रसिद्ध व्यावसायिक व्यक्तिमत्व अश्नीर ग्रोव्हर या आठवड्याच्या शेवटी 'राईज अँड फॉल' नावाचा रिअॅलिटी शो होस्ट करत आहेत. हा शो ६ सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर प्रसारित होईल.