Shruti Vilas Kadam
सोनम कपूरने विंबलडन जेंटलमेन फायनलमध्ये तिच्या स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा लूक सोशल मीडियावर ट्रेंड झाला.
सोनमने Ralph Lauren SS25 कलेक्शनमधील कॉटन पिनस्ट्राइप्स निळा पँटसूट परिधान केला होता, जो इंग्लिश उन्हाळ्यासाठी अगदी योग्य वाटला.
सोनमने तिच्या लुकला राल्फ लॉरेन हँडबॅग, सनग्लासेस, मनोला ब्लाहनिकचे टेनिस बॉल-डिझाइन शूज, आणि ऑडेमार्स पिगुए घड्याळ घालून लूक पूर्ण करुन दिला.
ही सोनम कपूरची विंबलडन स्पर्धेतील ४ थी उपस्थिती होती आणि यंदाही तिने फॅशनप्रेमही दाखवून दिलं.
या कार्यक्रमात केट ब्लॅंचेट, रसेल क्रो, निक जोनस, प्रियंका चोप्रा यांच्यासारख्या अनेक ग्लोबल स्टार्ससोबत सोनमचीही उपस्थिती ठळकपणे नोंदली गेली.
सोनम कपूरच्या आऊटफिटमध्ये फक्त सौंदर्यच नव्हे, तर तिचा आत्मविश्वास आणि फॅशन सेन्स दिसून आला.
सोनमचा सुसंगत आणि स्टायलिश लूक चर्चेचा विषय ठरला आहे.