Sonali Bendre: मराठमोळ्या सोनाली बेंद्रेचा हटके साडी ड्रेपिंग स्टाइल; मॉर्डन साडी लूकसाठी तुम्हीही करा या टिप्स फॉलो

Shruti Vilas Kadam

ग्रेसफुल लूकमुळे चर्चेत


‘पति, पत्नी और पंगा’ शोच्या सेटवर सोनाली बेंद्रे आपल्या अनोख्या साडी ड्रेपिंगमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचा पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

Sonali Bendre

ऑफ शोल्डर ड्रेपिंग


सोनालीने रॉयल ब्लू आणि सिल्वर रंगाच्या साडीला ऑफ-शोल्डर ब्लाउजसोबत जुळवले आहे. पल्लू खांद्यावरून हलकासा सोडून दिल्याने संपूर्ण लूक एलिगंट दिसतो.

Sonali Bendre

गाऊनसारखा फ्यूजन लूक


या ड्रेपिंग स्टाइलमध्ये साडीचा लूक गाऊनसारखा भासतो. पारंपरिक साडीला थोडा फॅशनेबल टच देत सोनालीने हा लूक पूर्णतः आधुनिक बनवला आहे.

Sonali Bendre

ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशन


सोनालीने ब्लॅक अँड व्हाईट साडीमध्ये फ्रंट प्लीट्स पिन केल्या आहेत आणि पल्लू मागे केपसारखा सोडला आहे. या स्टाइलमुळे साडीला वेस्टर्न फिनिश मिळतो.

Sonali Bendre

सोपी पण आकर्षक स्टाइल


ही ड्रेपिंग स्टाइल ऑफिसमधून पार्टीपर्यंत कुठेही सहज वापरता येते. हलक्या दागिन्यांसोबत हा लूक अधिक उठून दिसतो.

Sonali Bendre

कंफर्ट आणि एलिगन्सचा मिलाफ


दोन्ही साडी स्टाइल्समध्ये सोनालीने आरामदायी कपडे आणि एलिगंट फॅब्रिकचा वापर केला आहे, यामुळे लूक साधा पण आकर्षक वाटतो.

Sonali Bendre

फॅशनप्रेमींसाठी प्रेरणा


पारंपरिक साडीला नवा अंदाज देऊन सोनाली बेंद्रेने फॅशनप्रेमींना हटके ड्रेपिंग ट्राय करण्याची प्रेरणा दिली आहे. हे दोन्ही लूक लग्न, पार्टी किंवा फेस्टिव्हलसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

Sonali Bendre

Ananya Pandey: आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूँ...; अनन्याचा रॉयल लूक पाहिलात का?

Ananya Pandey
येथे क्लिक करा