Shruti Vilas Kadam
अनन्या पांडेचा हा लूक प्रसिद्ध महाराणी गायत्री देवी यांच्या पारंपरिक आणि एलिगंट स्टाइलवर आधारित आहे. ज्यात भारतीय आणि पाश्चिमात्य फॅशनचा सुंदर मिलाफ दिसतो.
अनन्याने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली हलक्या रंगाची जाळीदार साडी परिधान केली आहे, जी जुन्या राजेशाही सौंदर्याला आधुनिक ट्विस्ट देते.
साडीबरोबर तिने १९४८ मध्ये तयार केलेलाजॅक फॅथ ब्रँडचा फ्रेंच हॉट क्यूचर कोरसेट घातला आहे. यामुळे हा लूक ग्लोबल फॅशन टच देतो.
हा लूक गायत्री देवींच्या मिनिमल आणि रॉयल स्टाइलला दाखवतो.
अनन्याने हिरव्या पाचूचा चोकर, मोत्याचे इअरकफ, स्टेटमेंट रिंग आणि सोनेरी घड्याळ वापरले आहे, जे संपूर्ण पोशाखाला रॉयल ग्लॅमर देतात.
नॅचरल बेस, सौम्य गुलाबी लिपस्टिक, विंग्ड आयलाइनर आणि साइड-पार्टेड सॉफ्ट कर्ल्ससह तिने क्लासिक आणि एलिगंट लूक पूर्ण केला आहे.
हा लूक केवळ फॅशन स्टेटमेंट नाही तर भारतीय वारशाचा गौरवही आहे. जुनी शालीनता आणि आधुनिक ग्लॅमर यांचा सुंदर मिलाफ.