Rava Beetroot Cutlet Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी १० मिनीटात बनवा हॉटेल स्टाईल रवा बीटरूट कटलेट, नोट करा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य


बीटरूट कटलेट बनवण्यासाठी उकडलेले बीटरूट, बटाटे, रवा कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, ब्रेडक्रम्स आणि थोडं तेल लागते.

Rava Beetroot Cutlet

भाज्या तयार करणे


बीटरूट आणि बटाटे उकडून घ्या. त्यांना नीट किसून एका भांड्यात घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घाला.

Rava Beetroot Cutlet

मसाले घालणे


मिश्रणात मीठ, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि थोडा लिंबाचा रस मिसळा. सगळं नीट एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा.

Rava Beetroot Cutlet

कटलेट आकार देणे


तयार मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन कटलेटचा गोल किंवा अंडाकृती आकार द्या. प्रत्येक कटलेटला ब्रेडक्रम्स आणि रवा मध्ये घोळवा.

Rava Beetroot Cutlet

तळणे


तव्यावर थोडं तेल टाकून शॅलो फ्राय करा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी जास्त वेळ तळू नका.

Rava Beetroot Cutlet

सर्व्हिंग


गरम बीटरूट कटलेटला टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा. हे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी उत्तम पर्याय आहे.

Rava Beetroot Cutlet

फायदे


बीटरूटमध्ये आयर्न, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हे कटलेट शरीराला ऊर्जा देतात आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात.

Rava Beetroot Cutlet

केस खूप फ्रिजी झालेत? मग ट्राय करा 'हा' होममेड मास्क, २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि शायनी

Hair Care
येथे क्लिक करा