Shreya Maskar
सोलकढी बनवण्यासाठी आमसूल, हिरवी मिरची, लसूण, नारळाचे दूध , कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
सोलकढी बनवण्यासाठी सर्वप्रथम आमसूल कोमट पाण्यात २ ते ३ तास भिजवत ठेवा.
त्यानंतर त्यातील अर्क काढून हाताने मिक्स करून गाळून घ्यावा.
आता एका पॅनमध्ये नारळाचे दूध, आमसूलचे पाणी, लसूण आणि मिरची घालून मिक्स करा.
या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून ढवळावे.
या मिश्रणाला एक उकळी काढून थंड करायला फ्रिजमध्ये ठेवा.
आंबट-गोड सोलकढी गरमागरम भातासोबत खा.
सोलकढीमध्ये थोडा गोडवा हवा असेल तर त्यात गूळ किंवा साखर घालू शकता.