Shreya Maskar
कारल्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून घ्या.
त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात कारली उकडून घ्या.
पाण्यात आवर्जून मीठ घालायला विसरू नका.
उकळलेल्या मिठाच्या पाण्यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो.
उकडलेली कारली पॅनमध्ये तेल टाकून मस्त फ्राय करून घ्या.
आता पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये हळद, जिरे , धणे पावडर, मीठ , लिंबाचा रस, चिंचेचा कोळ आणि बेसन टाकून छान परतून घ्या.
आता या मिश्रणात कारली चिरून मिक्स करून घ्या.
भाजीची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात शेंगदाण्याचा कूट, तीळ, कोथिंबीर घालू शकता.