Dhanshri Shintre
सन 1998 मध्ये नरसिंग बाळकृष्ण सिद्धे यांनी सोलापुरात शेंगा चटणीचा व्यवसाय सुरू करत चविष्ट प्रवासाची पायाभरणी केली.
सोलापूरची चादर आणि ज्वारीप्रमाणेच शेंगदाणा चटणीही येथे अत्यंत लोकप्रिय आणि ओळख निर्माण केलेली आहे.
शेंगदाणे, लसूण पाकळ्या, लाल तिखट, मीठ, तेल, जीरे
चटणीसाठी लागणारे साहित्य आधी तयार करा. एक कप शेंगदाणे लोखंडी तव्यावर खरपूस भाजून घ्या.
भाजताना थोडं पाणी हाताला लावून भाजल्यास शेंगदाणे आतपर्यंत खरपूस भाजले जातात. नंतर साले चोळून काढून पाखडून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात जिरे, लसूण पाकळ्या परतून भाजलेले शेंगदाणे घालून चांगले परतून घ्या.
गॅस बंद केल्यावर लाल तिखट आणि मीठ घालावं, त्यामुळे तिखट जळत नाही आणि शेंगदाण्यांना सुंदर रंग येतो.
ही चटणी मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात जाडसर वाटून घ्या, नंतर हवाबंद काचेच्या बरणीत साठवा, जेवणात किंवा प्रवासात वापरण्यास योग्य ठरते.
ही झणझणीत चटणी गरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व्ह केल्यास अप्रतिम चव आणि अनुभव मिळतो.