Shreya Maskar
नळदुर्ग या मध्ययुगीन किल्ल्यावर 'नर' आणि 'मादी' हे प्रसिद्ध जुळे धबधबे आहेत. मुसळधार पावसात हे धबधबे खडकांवरून वेगाने खाली कोसळतात आणि धुक्यामुळे येथे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
उजनी धरणाला भीमा धरण असेही म्हणतात. सोलापूर जिल्ह्यात असलेले हे विशाल धरण पावसाळ्यात ओसंडून वाहते. येथील हिरवागार निसर्ग पावसाळ्यात खुलून येतो.
सोलापूर येथे ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. हा १६ व्या शतकातील प्राचीन किल्ला असून त्याच्याभोवती खोल खंदक आहे. पावसाळ्यात येथील परिसर हिरवागार होतो. हा ऐतिहासिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
आळंदी येथे प्रति पंढरपूर आहे. पुण्याजवळ असलेले हे ठिकाण पंढरपूरच्या मंदिराची एक सुंदर प्रतिकृती आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या दाट हिरवाईने वेढलेले हे ठिकाण पावसाळ्यात एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय उत्तम आहे.
सोलापूरला गेल्यावर न विसरता अक्कलकोटला जा आणि स्वामी समर्थांचे दर्शन घ्या. पावसाच्या सरींनंतर येथे हिरवेगार वातावरण पाहायला मिळते.
नानज येथे ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य आहे. पावसाळ्यात या वन्यजीव अभयारण्याचे रूपांतर एका विशाल गवताळ प्रदेशात होते. येथे दुर्मिळ पक्षी आणि विविध प्रकारची वनसंपदा पाहायला मिळते.
सोलापूर येथे प्रसिद्ध सिद्धेश्वर तलाव आहे. सिद्धेश्वर तलावाजवळ सिद्धेश्वर मंदिर आहे. पावसाळ्यात तलावाचा काठचा परिसर खुलून येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.