Mumbai To Pandharpur : विठ्ठलाच्या दर्शनाला 'पंढरपूर'ला जाताय? मुंबईहून जाण्यासाठी पाहा एकदम सोप्पा मार्ग

Shreya Maskar

पंढरीची वारी

सध्या सर्वत्र वारीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. वारकरी मंडळी 'पंढरपूर'ला विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहे. यंदा आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) शनिवार, 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल.

Vari of Pandhari | pinterest

पंढरपूर

पंढरपूर हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले हे शहर सोलापूरपासून पश्चिमेकडे ७२ किमी अंतरावर आहे.

Pandharpur | pinterest

मंदिराचे वैशिष्ट्ये

महाराष्ट्रातील पंढरपूर मंदिर (श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर) हे वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान विठोबा (भगवान श्रीकृष्णाचा अवतार) आणि देवी रुक्मिणी यांना समर्पित असलेले हे मंदिर भक्त पुंडलिक यांची कथा आणि भव्य 'वारी' यात्रेसाठी ओळखले जाते.

Features of the temple | pinterest

प्रवास कसा कराल?

मुंबई ते पंढरपूर प्रवास बस, ट्रेन किंवा कारने करता येतो. तुम्ही तुमच्या comfort आणि वेळेनुसार योग्य मार्ग निवडा.

How will you travel? | pinterest

बसचा प्रवास

मुंबईहून पंढरपूरला जाण्यासाठी अनेक प्रायव्हेट बस निघतात. तुम्ही रात्रीचा प्रवास करून सकाळी पंढरपूरला उतरू शकता. स्लीपर बस देखील उपलब्ध आहेत. बस प्रवासासाठी १०-११ तास लागतात. तसेच तिकिट ३०० - ४०० पासून सुरू होते.

bus journey | pinterest

ट्रेनचा प्रवास

पंढरपूरला जाण्यासाठी कुर्डुवाडी जंक्शन आणि सोलापूर जंक्शन ही रेल्वे स्टेशन जवळ आहे. हे स्टेशन विठ्ठल मंदिरापासून अवघ्या २ किमी अंतरावर आहे. तुम्ही येथे स्टेशनपासून रिक्षाने जाऊ शकता. या प्रवासासाठी ७ ते १० तास लागतात.

train journey | pinterest

कारने प्रवास

पुणे-सोलापूर महामार्गावरून सुमारे ३४० किमीचा प्रवास करा. यासाठी साधारण ६ ते ७ तास लागतात.

Travel by car | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : सावंतवाडीजवळील 'हा' निसर्गरम्य डोंगर पावसाळ्यात पाहायलाच हवा

Sawantwadi Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...