Sawantwadi Tourism : सावंतवाडीजवळील 'हा' निसर्गरम्य डोंगर पावसाळ्यात पाहायलाच हवा

Shreya Maskar

सावंतवाडी

सावंतवाडी हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक निसर्गरम्य शहर आहे. पश्चिम घाटाजवळील हिरवेगार कोकण प्रदेशात हे ठिकाण वसलेले आहे.

Sawantwadi | google

नरेंद्र डोंगर

नरेंद्र डोंगर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वसलेला निसर्गरम्य डोंगर आहे. पावसाळ्यात या ठिकाणाला आवर्जून भेट द्या.

Narendra Dongar | google

पक्षी निरीक्षण

पावसाळ्यात तुम्हाला पक्षी निरीक्षणांचा आनंद घ्यायचा असेल तर नरेंद्र डोंगर बेस्ट लोकेशन आहे. हा हिरवागार डोंगर विविध वन्यप्राणी आणि अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे निवासस्थान आहे.

Bird watching | google

नरेंद्र डोंगर उद्यान

डोंगरावर स्थित असलेले हे उद्यान शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. डोंगरावरील वाटेवर हनुमान मंदिर वसलेले आहे.

Narendra Hill Park | google

ट्रेकिंगचा आनंद

पावसाळ्यात डोंगरावरील वाटांवर लहान, हंगामी धबधबे पाहायला मिळतात. पावसाळ्यात मित्रांसोबत ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर नरेंद्र डोंगर उद्यानाला नक्की भेट द्या.

Enjoy trekking | google

सूर्यास्ताचा नजारा

नरेंद्र डोंगरावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Sunset | google

इतर पर्यटन स्थळे

नरेंद्र डोंगराच्या जवळच 'मोती तलाव' आणि 'सावंतवाडी राजवाडा' ही सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता. एक ट्रिप प्लान करा.

Other tourist destinations | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

Bhandardara Tourism | AI photo
येथे क्लिक करा...