Manasvi Choudhary
मराठी इंडस्ट्रीत सध्या लग्न सोहळे सुरू आहेत. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या घरी लगीन सोहळा पार पडत आहे.
आदेश बांदेकर यांचा लाडका लेक सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
सोहमच्या लग्नापूर्वीच्या सर्व विधींना सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर सोहमच्या संगीत, हळदी आणि मेहंदी समारभांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
यावरून नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे सोहम बांदेकरची होणारी बायको कोण आहे.सोहम कोणाशी लग्नबंधनात अडकणार आहे.
सोहम बांदेकर हा पूजा बिरारी हीच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. पूजा बिरारी नेमकी कोण आहे? तिच्या विषयी जाणून घेऊया.
पूजा बिरारी ही मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. येड लागलं प्रेमाचं, स्वाभिमान, साजणा या सारख्या मालिकांमध्ये पूजाने अभिनय केला आहे.
तर सोहम बांदेकर हा प्रसिद्ध निर्माता आहे सध्या ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांचा निर्माता आहे.