ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाव हे एक लोकप्रिय भारतीय ब्रेड आहे. पावाला अनेक पदार्थांसोबत खाल्ले जाते. जसे की, पाव भाजी, बन टिक्की, मसाला पाव आणि वडा पाव इ.
सॉफ्ट आणि फ्लफी पाव बनविण्यासाठी मैदा, साखर, मीठ, यीस्ट, लोणी बटर आणि दूध किंवा पाणी इ. साहित्य लागते.
यीस्टला गरम पाणी आणि साखरेसोबत मिक्स करुन घ्या, आणि मग त्याला मैदामध्ये मिसळून घ्या.
एकदम नरम पीठ मळून घ्या. पीठात बटर टाका आणि पुन्हा पीठ मळा.
पीठ उबदार जागी १ ते २ तास ठेवा, जेणेकरून ते फुगेल आणि दुप्पट होईल. यामुळे पाव फ्लफी मऊ होण्यास मदत होते.
आता फुगलेले पीठ खाली दाबून घ्या, त्याचे लहान भाग करा आणि त्यांना गोलाकार आकार द्या.
पाव बनवून झाल्यावर ते बेकिंग ट्रेवर ठेवा. त्यांना दूध किंवा पाणी लावा आणि त्याला पुन्हा फुगू द्या.
बेक झाल्यानंतर फ्लफी पाव तयार आहे. गरमा गरम पाव तुम्ही पाव भाजीसोबत खाऊ शकता.