ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आलेपाक हा हिवाळ्यात खाल्ला जाणारा पारंपरिक आयुर्वेदिक पदार्थ आहे. आलेपाकामुळे सर्दी खोकल्यास आराम मिळतो. तसेच थकवा आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहे.
ताजं आलं, साखर, पाणी, जायफळ पुड, लिंबाचा रस आणि वेलची पूड इ. साहित्य वापरून घरी सहज आलेपाक तयार करता येतो.
आलं सोलून स्वच्छ धुवून घ्या आणि किसणीने किसा किंवा बारीक तुकडे करुन घ्या. त्यामुळे पाकात नीट मुरण्यास मदत होते.
किसलेले आलं पाण्यात टाकून उकळा आणि पाणी गाळून घ्या. ही प्रक्रिया २ वेळा करा म्हणजे आल्यात असलेलसा कडूपणा निघून जातो.
एक कढईत घ्या. त्यात पाणी आणि साखर घालून ते मध्यम आचेवर उकळवून घ्या .पाक तयार झाला की पुढची स्टेप करा.
तयार केलेल्या पाकात आलं घाला आणि मंद आचेवर सतत ढवळत राहा आणि शिजवून घ्या.
पाक घट्ट झाल्यावर लिंबाचा रस, वेलची पूड आणि जायफळ पुड घाला. यामुळे चव आणि टिकाऊपणा वाढतो.
मिश्रण कढईच्या कडांना लागले की आलेपाक तयार झाला असे समजायचे. आलेपाकाच्या बारिक वड्या करुन त्या तुम्ही सर्व्ह करु शकता.
आलेपाक वडी थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवावी. रोज १ किंवा २ वडी खाल्यास आरोग्यास फायदा होतो.