ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ही एक पोष्टिक आणि स्वादिष्ट दही मिश्रित व्यंजन आहे. जे जेवणाची चव अधिक वाढवते.
ताजे दही, किसलेले बीट, भाजलेली जीरा पावडर, मीठ, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर इ. साहित्य लागते.
सर्वात आधी बीट उकडून घ्या, त्यानंतर ते सोला आणि बीट किसून घ्या. असे केल्यास रायत्याला रंग आणि गोडपणा येतो. बीट उकडलेले नको असल्यास कच्चेसुध्दा किसून घेवू शकता.
दह्याला चांगल्या पध्दतीने फेटून घ्यावे जेणेकरुन रायता बनवताना दह्याच्या गुठल्या राहणार नाही. दही एकदम मऊ बनवून घ्या.
फेटून घेतलेल्या दह्यात भाजलेली जीरे पावडर, मीठ आणि बारिक कापलेली हिरवी मिरची मिक्स करा.
आता दह्यामध्ये किसलेले बीट टाका आणि चांगले मिक्स करुन घ्या.
तयार केलेल्या रायत्याला कोथिंबीरने सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.तुम्ही मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देखील घालू शकता.