Manasvi Choudhary
नाश्त्याला घरी विविध पदार्थ बनवले जातात. जाळीदार ढोकळा खायला सर्वांना आवडते.
ढोकळा बनवण्यासाठी बेसन, तेल, साखर, मीठ, अॅसिड, खाण्याचा सोडा, पाणी, कढीपत्ता, मिरची, पाणी आणि कोथिंबीर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घ्या आणि यामध्ये मीठ, साखर व सायट्रिक अॅसिड घ्या.
नंतर सर्व मिश्रण मिक्स करून यामध्ये दोन चमचे तेल घाला
संपूर्ण मिश्रणात थोडे थोडे पाणी घाला नंतर ढोकळ्याचे पीठ भिजवून ते झाकून ठेवा.
नंतर ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला तेल लावा. कुकरमध्ये किंवा एका भांड्यात पाणी गरम करा.
दहा मिनिटांनी ढोकळ्याचे भिजवलेले पीठ परत मिक्स करून घ्या. या पिठात सोडा घालून पीठ मिक्स करून घ्या.
गॅसवर ढोकला बनवण्याच्या भांड्यात किंवा कुकरमध्ये ढोकळा वीस मिनिटे शिजवून घ्या.
गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जीरे घाला नंतर त्यात हिंग घाला व मिरची कढीपत्ताची फोडणी द्या.
कुकरमध्ये काही मिनिटांनी ढोकळा शिजला का चेक करून घ्या.
तयार ढोकळ्याचे पीठ शिजल्यानंतर त्यावर तडका द्या. नंतर सुरीने ढोकळ्याचे चौकोनी आकार करा.
अशाप्रकारे सर्व्हसाठी खंमग ढोकळा तयार आहे.