ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याचजणांना झोपेत घोरण्याची सवय असते. काहीजणांसाठी ही फक्त एक सवय नाही तर समस्या बनली आहे.
लठ्ठपणामुळे घशातील ऊतींवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे झोपेत श्वास घेताना घरररर् घरररर् असा आवाज होतो. यालाच घोरणे असे म्हणतात.
धूम्रपान आणि मद्दपान करणाऱ्या व्यक्तींना घोरण्याची समस्या मोठ्याप्रमाणावर उद्भवते. कारण यामुळे घशातील ऊतींना सूज येऊ शकते व घोरणे वाढते.
नाक किंवा घशातील ऍलर्जी, सर्दी किंवा टॉन्सिल्समुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळेही काहीलोक झोपताना घोरतात.
काहीवेळा घोरणे आनुवांशिक देखील असू शकते.
एका वैद्यकिय रिपोर्टनूसार, घोरण्याचे कारण शरीरीतील व्हिटॅमिन्सची कमतरताही असू शकतं.
तुमच्या शरीरातील 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे तुम्हाला घोरण्याची समस्या उद्भवते. म्हणून तुमच्या आहारात डी व्हिटॅमिन असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश करा.
तेलकट मासे जसे की, सॅल्मन, सार्डिन, ट्राउट, हेरिंग किंवा मॅकरेल. तसेच अंड्यातील पिवळं बलक, नट्स आणि बिया हे अन्नपदार्थ खाल्याने शरीराला व्हिटॅमिन डी'ची उपलब्धता होते.
पालक, तुर, मेथी अशा हिरव्या भाज्यांमध्येही डी व्हिटॅमिन असतो. तसेच घोरण्याच्या समस्येची इतर कारणेही असू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.