ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात हळद वापरली जाते. हळदीत असलेल्या अँटिबायोटिक गुणधर्मामुळे सर्दी, खोकला अशा अनेक आजारांवर औषध म्हणून देखील तिचा वापर केला जातो.
मसाला किंवा औषध म्हणून हळदीचा वापर होत असला तरी, अतिप्रमाणात सेवन केल्यास. ते किडनीसाठी हानीकारक ठरू शकते.
हळदीमध्ये ऑक्सॅलेट्स असतात. त्यामुळे अतिप्रमाणात हळद खाल्ल्यास मूत्रात ऑक्सॅलेट्सचे प्रमाण वाढते आणि किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
हळदीतील सक्रिय संयुग कर्क्युमिनच्या उच्च डोसमुळे नेफ्रोटॉक्सिक परिणाम होतो. ज्यामुळे किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये किडनीचे नुकसान वाढण्याची शक्यता असते.
तुम्ही किडनीच्या उपचारासाठी रक्त पातळ करणारी किंवा इतर आवश्यक औषधे आधीपासून घेत असाल तर हळदीच्या संपर्कात आल्यास ते घातक ठरू शकते.
हळद अॅसिड रिफ्लिक्स आणि पित्ताशयाचे खडे यांसारख्या पोटाच्या समस्या वाढवू शकते.
गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रिया जेवणातून हळद खाऊ शकतात. पण हळदीचे प्रमाण वाढल्यास गर्भाशयाचे आकुंचन होण्याची शक्यता असते.
दररोज साधारणत: शरीराच्या वजनानूसार सुमारे १.४ मिलीग्राम म्हणजे १२ ग्रॅम इतक्याच प्रमाणात हळदीचे सेवन करावे.
तुम्ही किडनीच्या उपचारासाठी रक्त पातळ करणारी किंवा इतर आवश्यक औषधे आधीपासून घेत असाल तर हळदीच्या संपर्कात आल्यास ते घातक ठरू शकते.