ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काहीवेळा सारखी लाईट जाते, फ्रिजमध्ये जागा कमी पडते. पावसाळ्यात तर बॅक्टेरियांचे प्रमाण वाढते म्हणून फ्रिजमधले अन्न खाणे टाळावे असा सल्ला दिला जातो.
अशावेळी अन्न नेमके साठवायचे तरी कसे? असा प्रश्न सगळ्याच गृहिणींना पडतो. पण तुम्ही पुढील काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर फ्रिजची गरज भासणार नाही.
पाण्यात ठेवलेल्या भाज्या जास्तकाळ टिकून राहतात. तसेच स्वच्छही राहतात.
बाजारातून आणलेली फळे, भाज्या, धूतल्यानंतर तशाच न ठेवता त्या वाळवा. ओलावा राहिल्याने भाज्या लवकर खराब होऊ शकतात.
फळांमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे भाज्या खराब होऊ शकतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.
सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे भाज्या खराब होण्याच्या प्रक्रियेला वेग मिळतो. म्हणून भाज्या कोरड्या जागी किंवा एखाद्या कपाटात ठेवा.
फळे ठेवण्यासाठी योग्य व्हेंटिलेशन असलेल्या जाळीदार टोपल्या किंवा डबे वापरा.
तुमच्याकडे फ्रिज नसेल तर, आधीच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली फळे, भाज्या खरेदी करणे टाळा. कारण रूम टेम्प्रेचरच्या संपर्कात आल्यास ते लवकर खराब होऊ शकतात.