ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जीवनसत्त्वे, लोह आणि अॅन्टीऑक्सिडेंट्सचा उत्तम स्त्रोत असलेली अनेक फळे केस गळती कमी करतात. केस वाढवण्यास मदत होते.
बेरी (स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी) मध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडेंट्स असतात. जे केसांच्या मुळांना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि कोलेजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.
द्राक्षे केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले, लोह शोषण्यास मदत करतात. हे व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्त्रोत आहेत.
केळींमध्ये पॉटॅशिअम, व्हिटॅमिन ए असतात. जे त्वचेला मॉईस्ट ठेवणारा सीबम हा घटक तयार करतात. यामुळे स्कॅल्प आणि केस निरोगी राहतात.
निरोगी चरबी आणि व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणत असलेले एव्होकाडो खाल्ल्याने, टाळूमध्ये चांगल्या प्रकारे रक्ताभिसण होते आणि केस वाढीस उपयुक्त ठरते.
पपईमध्ये असलेले अ आणि क जीवनसत्त्व केसांची गळती कमी करतात ज्यामुळे केस वेगाने वाढतात.
आवळ्याचे सेवन केसांची मुळे मजबूत करतं. तसेच केस लवकर पांढरे होण्यापासून थांबवतात.
पेरूमधील अ आणि क जीवनसत्त्व केसांमध्ये कोंडा होण्यापासून रोखतात. आणि केसांची मुळे स्वच्छ राहतात. तसेच केस गळणे कमी होते.
संत्र्यामधील पोषक घटक केसांचा पोत सुधारण्यास मदत करतात. केसांच्या क्यूटिकलला सील करून ओलावा टिकवून ठेवतात. यामुळे केस मऊ आणि चमकदार बनतात.