ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही घरातल्या मोठ्यांकडून नेहमी, 'श्रावणात केस कापू नये' असे ऐकले असेल. पण यामागचे नेमके कारण काय? तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया.
श्रावण महिना शिवाला अर्पण केलेला अत्यंत पवित्र महिना मानला जातो.
श्रावणात जप, तप, व्रत आणि संयमाचे पालन केले जाते.
या महिन्यात शरीरीवर नियंत्रण, शांतता ठेवणे आणि साधना करणे यावर भर दिला जातो.
अनेक लोकांचा विश्वास आहे की, या महिन्यात केस कापल्यास धार्मिक दोष लागतो किंवा पुण्य कमी होते.
श्रावण महिन्यात केस कापल्याने काय होते, याबद्दल अनेक धर्मिक आणि वैज्ञानिक मान्यता आहेत.
असे म्हटले जाते, जे लोक श्रावणात व्रत करतात त्यांनी केस कापले, दाढी केली किंवा नखं कापली तर त्यांचे व्रत निष्फल होऊ शकते.
धार्मिक दृष्या श्रावण महिना भगवान शंकराची उपासना करण्याचा आणि आध्यात्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात केस कापणे आध्यात्मिक शुद्धतेसाठी अयोग्य मानले जाते.
वैज्ञानिक दृष्या श्रावणात वातावरण दमट असल्यामुळे बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढून केस गळणे किंवा खाज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केस कापणे टाळले जाते.