Snoring : झोपेत का घोरतात? काय आहेत कारणे, ती किती गंभीर?

Shreya Maskar

रात्री घोरणे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपताना मोठ्याने घोरण्यामागे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया (Obstructive Sleep Apnea) हा झोपेशी संबंधित श्वसनाचा विकार असू शकतो.

Snoring at Night | pinterest

स्लीप अ‍ॅप्निया

स्लीप अ‍ॅप्नियामध्ये झोपताना श्वसनमार्ग वारंवार अरुंद होतो किंवा काही काळासाठी बंद होतो. त्यामुळे श्वास घेण्यात अडथळा येतो, झोप वारंवार खंडित होते आणि शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही.

Sleep Apnea | pinterest

घोरणे- स्लीप अ‍ॅप्नियाचा काय संबंध?

झोपताना घशातील स्नायू सैल होतात. त्यामुळे श्वसनमार्ग अरुंद झाल्यास हवा जाताना आसपासच्या मऊ ऊतींमध्ये कंपन निर्माण होते आणि घोरण्याचा आवाज येतो. स्लीप अ‍ॅप्नियामध्ये हा श्वसनमार्ग अधिक अरुंद होऊन काही काळासाठी बंद होऊ शकतो. त्यामुळे श्वास थांबल्यासारखा होतो.

Snoring and Sleep Apnea | pinterest

स्लीप अ‍ॅप्निया होण्यामागील कारणे

स्लीप अ‍ॅप्निया होण्यामागे वजन जास्त असणे, पाठीवर झोपणे, घशातील टॉन्सिल मोठे असणे, मद्यपान आणि धूम्रपान ही कारणे असतात.

Sleep Apnea | pinterest

लक्षणे काय?

मोठ्याने आणि नियमित घोरणे, सकाळी डोकेदुखी आणि थकवा जाणवणे, एकाग्रता कमी होणे, झोपेत श्वास थांबणे किंवा गुदमरल्यासारखे होणे

Symptoms | pinterest

धोके काय?

स्लीप अ‍ॅप्नियावर वेळीच उपचार केले नाही तर, झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि दिवसा अतिशय झोप येऊ शकते. तसेच उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

Risks | pinterest

उपाय

पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. मद्यपान आणि धूम्रपान टाळा. झोपेचे नियमित वेळापत्रक पाळा. वजन कंट्रोल करा.

Remedies | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : गरमागरम चहा पिण्याची सवय पडेल महागात, ३ दुष्परिणाम वाचून चहा पिणेच सोडाल

Tea | AI PHOTO
येथे क्लिक करा....