Shreya Maskar
दिवसभर काहीही त्रास होत नाही; पण रात्री झोपायला गेल्यानंतर अचानक शिंक येऊ लागतात. कधी सलग शिंका येतात, तर कधी नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे किंवा घशात खाज जाणवते. हा त्रास अनेकांना होतो.
बेडरूममध्ये साचलेली धूळ, पडदे, गालिचे, उशा आणि गादीमध्ये असणारे सूक्ष्म धूलिकण अॅलर्जी निर्माण करू शकतात. झोपताना या संपर्कात आल्यामुळे सतत शिंका येऊ शकतात.
बेडशीट आणि उशा नियमित स्वच्छ न केल्यास त्यामध्ये धूळ आणि अॅलर्जी निर्माण करणारे घटक साचू शकतात. डोके उशीवर ठेवल्यानंतर शिंका, नाक खाजणे किंवा नाक वाहणे सुरू होऊ शकते.
रात्री एसीचा थंड आणि कोरडा वारा थेट चेहऱ्यावर येत असल्यास नाकाच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो. काही व्यक्तींमध्ये तापमानातील अचानक बदलामुळेही शिंक येतात.
रात्री अचानक शिंका सुरू होण्यामागे सर्दी किंवा विषाणूजन्य संसर्गही कारणीभूत असू शकतो. यासोबत घसा दुखणे, खोकला, नाक वाहणे आणि ताप अशी लक्षणे दिसू शकतात.
घरात मांजर, कुत्रा यांसारखे पाळीव प्राणी असल्यास त्यांच्या केसांमधील किंवा त्वचेतील सूक्ष्म कणांमुळे अॅलर्जी होऊ शकते. बेडरूममध्ये प्राणी येत असल्यास रात्री शिंका येण्याचा त्रास वाढू शकतो.
बेडशीट, उशांचे कव्हरे आणि चादरी नियमित धुवा. बेडरूममधील धूळ, पडदे आणि गालिचे स्वच्छ ठेवा. एसीचा वारा थेट चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT : २४ तास AC मध्ये राहताय? सावधान! वाढतो 'या' ५ गंभीर समस्यांचा धोका