Saam Tv
प्रत्येकाला आपलं घर निट सजलेलं आणि सुंदर आकर्षक वाटणारे हवे असते.
हल्ली लोक घरांमध्ये विविध प्रकारची लहान रोप लावत आहेत.
घरात रोप लावल्याने अनेक फायदे आपल्या नकळत मिळतात. चला जाणून थोडक्यात माहिती.
तुम्ही घराच्या सुंदरतेसाठी आणि घराच्या फायद्यासाठी स्नेक प्लांट लावू शकता.
घरात स्नेक प्लांट लावल्याने बेंझिन, जाइलिन आणि टोल्युइन यांसारखे हानिकारक वायू घराबाहेर जातात.
तुम्ही पाहिले असेल तर हे झाड पांढरा आणि हिरव्या रंगाचे असते. हे डिझाइन सर्वोत्तम मानले जाते.
स्नेक प्लांटला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. याला १० ते १४ दिवसांनी एकदाच पाणी द्यावे लागते.
स्नेक प्लांट हे घरातील वनस्पतींपैकी एक आहे जे मातीशिवाय वाढू शकते.
या प्लांटला सतत लागवडीची गरज नसते. ते भराभर वाढत जात असते.