साप चावला तर सर्वात आधी करा 'हे' १ काम; हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत वाचू शकतो जीव

Manasvi Choudhary

पावसाळ्यात सापांची भिती

पावसाळ्यात शेतात, बागेत, रस्त्याच्या कडेला साप दिसतात यामुळे साप चावण्याची भिती असते. पावसाळ्यात साप चावल्यानंतर त्वरीत काय काळजी घ्यावी हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Snake Bite Treatment

शांत झोपा

साप चावल्यानंतर भीतीमुळे किंवा धावपळ केल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे विष शरीरात वेगाने पसरते. रुग्णाला एका जागी शांत बसवून किंवा झोपवून ठेवा.

Snake Bite Treatment

दंश झालेला भाग स्थिर ठेवा

हात किंवा पायाला साप चावला असल्यास त्या भागाची हालचाल पूर्णपणे थांबवा. शक्य असल्यास लाकडाची फळी किंवा कपड्याच्या सहाय्याने तो भाग बांधून स्थिर ठेवा.

Snake Bite Treatment

अवयव मोकळे सोडा

जर पायाला चावला असेल तर पाय खाली सोडा, जेणेकरून विष हृदयापर्यंत लवकर पोहोचणार नाही.

Snake Bite Treatment

दागिने किंवा घट्ट कपडे काढा

साप चावल्यामुळे त्या भागावर सूज येऊ शकते. म्हणून हातातील अंगठी, घड्याळ, कडे किंवा घट्ट कपडे काढून टाका.

Snake Bite Treatment | Pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पावसाळ्यात जीन्स लवकर सुकत नाही? वापरा ही भन्नाट ट्रिक

Monsoon Jeans Drying Tips
येथे क्लिक करा...