Manasvi Choudhary
पावसाळ्यात कपडे सुकवणे अत्यंत कठिण असते. त्यात जिन्सचा कापड लवकर सुकत नाही. त्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो.
पावसाळ्यात जिन्स झटपट सुकवण्यासाठी सोप्या आणि स्मार्ट टिक्स तुम्ही वापरू शकता.
जिन्स पाणी असेल तर मोठ्या टॉवेलवर किंवा एका कपड्यावर गुंडाळून पिळून घ्या. कापडे पाणी लवकर शोषून घेते.
जर तुम्ही मशीनमध्ये कपडे धुणार असाल, तर जिन्स सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करा.
जिन्स सुकवताना उलटी करा. जिन्सचे खिसे आणि कमरेचा भाग जाड असतो, उलटे केल्याने तो भाग लवकर सुकतो.
बाहेर पाऊस असेल तर जिन्स घरात पंख्याच्या अगदी खाली किंवा घरात जिथे खिडकीतून हवा खेळती राहते अशा ठिकाणी ठेवा.
जर जिन्स थोडीच ओलसर असेल तर गरम इस्त्री फिरवा. जिन्सच्या खिशांच्या व कमरेच्या भागावर आतून हवा मारा. ओलसरपणा कमी होईल.